घरमहाराष्ट्रनाशिकनिर्यातबंदीप्रश्नी येवला प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

निर्यातबंदीप्रश्नी येवला प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

सरकार शेतकरीविरोधी असल्याचं मत

येवला तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या हितासाठी विनाअट तत्काळ कांदा निर्यातबंदी न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी केल्याने शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीरच खुपसला आहे. मागील सहा महिन्यांत शेतकर्‍यांना बेभाव कांदा विकावा लागल्याने शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. मात्र, आता कोणाचीही ओरड नसताना केंद्र शासनाने अचानकपणे निर्यातबंदी केल्याने हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचं या निर्णयामुळे स्पष्ट होत आहे. यावर्षी कांदा शासनाने जीवनावश्यक वस्तूमधून वगळून टाकला असतांना निर्याबंदीचा हा निर्णय अनैतिक असून तो तत्काळ विनाअट मागे घ्यावा. अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती अध्यक्ष हितेश दाभाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष वसंत झांबरे, संघटक किरण चर्मळ, ज्ञानेश्वर जगताप, भागवत भड, सागर गायकवाड, गोरख निर्मळ, महेबूब शेख, गणेश लोहकरे, सचिन पवार, वाल्मीक चव्हाण, संतोष रंधे, बाबासाहेब अंकुरकरे, ऋषी गायकवाड, महेश जानराव, वैभव देवरे, संदीप लांडगे, अंकुश कदम, राजेंद्र कदम, सुनील साताळकर, सागर माळी, बाबासाहेब बोराडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -