पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

क्लासला जातो असे सांगून खतप्रकल्पाकजवळ घेतले स्वतःला पेटवून

Nashik
Burnt alive
पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या एका तरुण पाथर्डी फाट्याजवळील खतप्रकल्पाजवळ डिझेल अंगावर टाकत पेटवून घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखत नागरिकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अन्थो वर्गीसकुमार अ‍ॅरोन्सन (२७, रा.सिडको, मूळ रा.केरळ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अन्थो वर्गीसकुमार अ‍ॅरोन्सन हा तरुण सोमवारी, २२ रोजी सायंकाळी ६ वाजता क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. त्याने पेट्रोलसाठी आईकडून दोनशे रुपये घेतले. क्लासला जाण्याऐवजी तो खतप्रकल्पाजवळ आला. प्रकल्पाच्या बाहेरील रस्त्यालगत डिझेल अंगावर टाकत पेटवून घेतले. ही बाब पादचार्‍याच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करीत नागरिकांना बोलावले. नागरिकांनी त्याला पाण्याच्या डबक्यात टाकून आग विझविली.

१०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी (ता.२३) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.एस. जाधव तपास करीत आहेत.