तरुणाईच्या नजरेतून स्वातंत्र्यदिन….

पूरग्रस्तांना मदतीसोबतच आपल्या देशाची बंधुता एकात्मता टिकवून ठेवण्याची जबाबदारी

Nashik

यावर्षी १५ ऑगस्ट साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्राला पुराच्या पाण्याने वेढले. यामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाले तर अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे; आपण आजचा हा स्वातंत्र्यदिन त्यांना मदतीचा हात पुढे करून आपल्या देशाच्या प्रतिज्ञेला तसेच संविधानाच्या प्रस्तावनेमधील बंधुत्व या भावनेला उचित ठरवू शकतो.. त्यासोबतच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले त्यांनाही सलाम करत नाशिकमधील तरुणाईने ’आपला महानगर’ सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या..

सैनिकांना सॅल्युट

इक्बाल
इक्बाल मणियार

आपण प्रतिज्ञेत सारे भारतीय माझे बांधव असल्याचे म्हणतो; मात्र ते कितपत आपण स्वतःमध्ये अवलंबितो? हा प्रश्न विचार करण्यास भाग पाडतो. सध्या राज्यातील काही भागावर जे संकट कोसळले आहे त्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या प्रतिज्ञेला जागून आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत त्यांना करायला पाहिजे. आपले सैनिक दिवसरात्र सीमेवर आपले रक्षण करत असतात तसेच देशावर काही आपत्ती आल्यास सैनिकच रेस्क्यू ऑपरेशन करून अनेकांचे जीव वाचवतात. या स्वातंत्र्यदिना निमित्ताने त्यांना सॅल्युट. – इक्बाल मणियार, गंगापूर

 

काश्मीरमध्ये देखील तिरंगा अभिमानाने फडकणार

यावेळचा स्वातंत्र्यदिन खूप अर्थाने वेगळा आहे. राज्यामध्ये पुरपरिस्थितीने अनेक कुटुंबांवर संक्रांत कोसळली आहे. त्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मुख्यमंत्री सहायता निधिमध्ये आपले योगदान दिल्यास हा स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय करू शकतो. त्याचबरोबर यावर्षी कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये देखील तिरंगा अभिमानाने फडकणार आहे. स्वातंत्र्य मिळविताना अनेकांनी आपल्या जिवाची बाजी लावली त्यांना सलाम.
                                    कमलेश पिंगळे, मखमलाबाद

 

प्रेरणा मिळविण्याचा दिवस

सागर आंधळे
सागर आंधळे

स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे याचा नक्कीच आनंद आहे. जगाच्या इतिहासात १५ ऑगस्ट या दिवसाला महत्व प्राप्त होण्यामागे भारताला मिळालेले स्वातंत्र्य. हे फक्त स्वातंत्र्य नसून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाचा मोठा परिणाम आहे. याच शाश्वत सत्याग्रहाची प्रेरणा घेऊन जगातील आफ्रिकेसारखे देश स्वतंत्र झाले. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रती आपल्या भावना प्रकट करण्याचा त्यातून प्रेरणा मिळविण्याचा दिवस आहे.
सागर आंधळे, सिन्नर

 

भारतमातेच्या शूरवीरांना नमन

मनीषा
मनीषा बागूल

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्रणाची पर्वा न करता योगदान दिले. या शूरवीरांना या दिवसाच्या निमित्ताने आपण आवर्जून श्रद्धांजली वाहिली पाहिजे. यांच्यामुळेच आपण आज सुखाने जीवन जगात आहोत. त्यांच्यासाठी या दोन ओळी…
आज़ादी की कभी शाम नहीं होने देंगे,
शहीदों की क़ुरबानी बदनाम नहीं होने देंगे,
बची हो जो एक बूंद भी लहू की,
तब तक भारत मा का आंचल नीलाम नहीं होने देंगे।
मनीषा बागुल, नाशिक

राज्यघटनेमुळे एकता टिकून आहे

रोशनी
रोशनी बोधले

७२ वर्षांनंतर देखील आपल्या देशातील विविधतेमधील एकता टिकून आहे. ही एकता टिकून राहण्याचे कारण म्हणजे आपल्या देशाची घटना. ही घटना तयार करताना घटनाकर्त्यांनी आपल्याला मिळालेले स्वराज्य टिकून कसे ठेवावे हा महत्वाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून बंधुभाव आणि सर्वधमसमभाव या बाबींचा विचार केला; आणि म्हणूनच आज देशाच्या कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यास सर्व देश आपल्या बांधवांसाठी उभा राहतो. या स्वातंत्र्यदिनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार्य समाजसेवकांना नमन करणे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत देश विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे योग्य असेल.                 – रोशनी पांडुरंग बोधले, नाशिक

यानिमित्ताने पूरग्रस्तांना मदत करा

पराग
पराग सानप

सर्वप्रथम स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. पुर परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या आपल्या बांधवांना मदतीचा हात देणे यानिमित्ताने योग्य असेल. फक्त ही मदत त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. थोडक्यात सांगायचे आपली बंधुता फक्त वाचण्यापुरती न ठेवता तिचा अवलंब व्हावा. – पराग सानप, कॉलेज रोड, नाशिक

 

आपल्या देशाची यशोगाथा

दीपक
दीपक जोंधळे

या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ठ म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले भारताचे घनिष्ठ संबंध. स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे संबंध टिकवून ठेवण्यास तसेच परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे आज भारत जगाच्या नकाशावर एक वेगळ्याच अंगाने चमकतो आहे. आपल्या देशाची अवकाश संशोधन यंत्रणा आज जगाच्या इतर देशाच्या तुलनेत तीसर्‍या क्रमांकावर आहे. हीच आपल्या देशाची यशोगाथा आहे.दीपक जोंधळे, गंगापूर

तिरंगा मध्येच आपल्या देशाचे महत्व आहे

सीमा
सीमा दिवटे

आपल्या देशाचा तिरंगा मध्येच आपल्या देशाचे महत्व आहे. घटनाकर्त्यांनी तिरंगा निवडतानाच भविष्यात आपल्या तिरंगा एक प्रतीक म्हणून गणले जाईल यासाठी त्याचे महत्व विषद केले होते. यामधील प्रथम केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामधील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे.सीमा दिवटे, सिडको, नवीन नाशिक

तरुणांनी हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

अमेय
अमेय केळकर

भारताच्या वैभवशाली इतिहासातील लिहिले गेलेले सवर्ण अक्षरातील पान म्हणजे १५ ऑगस्ट १९४७. दीडशे वर्षांच्या गुलामगिरिच्या साखळदंडतून भारतीयांनी स्वतःला मुक्त दिले, त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिन साजरा व्हावा आणि आपल्या सारख्या तरुणांनी हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ७३वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.अमेय पवार, पंडित कॉलनी, नाशिक

बलशाली विविधतेत एकता असनारे राष्ट्र घडविन्यात सर्व भारतीयाने योगदान द्यावे.

अमोल
अमोल काळे

स्वांतत्र्य या शब्दातच सर्व सार आला भारतीय कित्येक पिड्यांच्या संघर्षानंतर व बलिदाणानंतर हे भारतीय स्वांतत्र्य आपल्याला मिळाले त्याचा वापर योग्य करुन कुनाच्याही स्वातंत्र्याला बाधा न आनता स्वातंत्र्य ऊपभोगावे व भारताला बलशाली विविधतेत एकता असनारे राष्ट्र घडवीन्यात सर्व भारतीयाने योगदान द्यावे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध हे सर्वधर्माचे लोक आपल्या देशात एकत्र राहतात. म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून सुद्धा आपल्या देशाची ओळख आहे. ती टिकविण्याचा प्रयत्न करूया.. सर्व भारतियाना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप सुभेच्छा अमोल काळे, सय्यद पिंप्री, नाशिक

राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपले योगदान देण्याचा संकल्प करावा

ऋषि
ऋषि आहेर

७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांस हार्दिक शुभेच्छा ! ३७० व ३५ अ कलम रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर हा स्वातंत्र्य दिन विशेष महत्वाचा आहे. देश या काळात एका नवीन पर्वाकडे वाटचाल करीत आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व युवा वर्गाने देशसेवे साठी व राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपले योगदान देण्याचा संकल्प करावा. तसेच जातीभेद विसरून एकोप्याने राहण्याचा निश्चय करावा. ऋषिकेश जयंत आहेर, शहराध्यक्ष, भाजपा विद्यार्थी आघाडी नाशिक महानगर

आता आसेतूहिमाचल ही संज्ञा पूर्ण झाली

नवीन
नवीन कमोद

७३व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेछा. तुलनेने हा स्वातंत्र्यदिन सर्वात वेगळा असणार आहे. कश्मीर मध्ये आपला तिरंगा फडकणार आहे. सर्व भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. आता आसेतूहिमाचल ही संज्ञा पूर्ण झाली आहे. आजच्या दिवशी सर्व समाजसेवक तसेच ज्यांचे आपल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान आहे त्यांना नमन.  –  नवीन कमोद, मुंबई नाका, नाशिक