घरमहाराष्ट्रनाशिकअवकाळीग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

अवकाळीग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Subscribe

अगोदरच शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर असताना दोन दिवसांपासून बरसणार्‍या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना तडाखा बसला आहे.

अगोदरच शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर असताना दोन दिवसांपासून बरसणार्‍या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना तडाखा बसला आहे. या पावसाने कांदा, गहू, द्राक्ष पिकांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. साठवलेला कांदा खराब होण्याची भिती आहे. मात्र, अवकाळी पावसाने कांदा खराब झालाच, तर त्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍याला मदतीसाठी कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांची परवड होणार आहे.

पहिल्याच अवकाळी पावसाने जिल्ह्यात ४ बळी घेतले आहेत. अजूनही दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदात वर्तवण्यात आला आहे. अगोदरच दुष्काळ त्यात शेतमालाचे गडगडलेले भाव, यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. येवला, नांदगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना भाव पडल्याने मोठा दणका बसला आहे. सध्या गहू आणि कांदा काढणीचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतात तसेच कांदाचाळीत साठवण्यात आलेल्या कांद्याला फटका बसणार आहे. या पावसामुळे आंब्याचा मोहरही धोक्यात आला आहे. त्यामुळे अवकाळीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा असताना शासनाच्या नियमाचा फटका अवकाळीग्रस्तांना बसणार आहे. शासन निर्णयानुसार अवकाळी पाउस होऊन उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी मदतीस पात्र ठरतात. मात्र, शेतमाल साठवून ठेवल्यास आणि त्या मालाचे नुकसान झाल्यास मदत देता येत नाही. एकीकडे शासनाने कांदा कांदा साठवणुकीसाठी चाळीला अनुदानाची योजना सुरू केली. मात्र, सगळ्यांनी कांदा चाळी बांधलेल्या नाही. अनेकांचा कांदा अजूनही चाळीशिवाय पडून आहे.

- Advertisement -

अवकाळी पावसाचा आणखी दोन दिवस धोका आहे. शेतीचे नुकसान झाले तसे साठवलेल्या कांद्याला अवकाळी पावसाचा दणका बसू शकतो, अशी अनेक तालुक्यांतील स्थिती आहे. कांदा साठवणुकीची जबाबदारी शेतकर्‍यांची आहे. त्याचे पंचनामे होत नाहीत. नुकसान झाले तरी, मदतीची शक्यता नाही. अशा स्थितीत हजारो टन कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात हजारो टन कांदा तयार आहे. त्याला अवकाळी पावसाचा दणका बसला तर शेतकर्‍यांवर
पुन्हा अश्रू ढाळण्याची वेळ येणार आहे.

कांदा सांभाळण्याची जबाबदारी शेतकर्‍याचीच

अवकाळी पावसात जीव गमावलेल्या कुटुंबाना प्रत्येकी चार लाख याप्रमाणे मदत वाटप करण्यात आली आहे. दोन दिवसांत ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल.पण अवकाळीच्या पावसात साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले, तर मात्र त्यासाठी तरतूद नाही. साठवलेला कांदा सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकर्‍याचीच असते. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -