जि. प. कर्मचार्‍यांना मुख्यालय सोडण्यास बंदी

Nashik

नाशिक : देशात 14 एप्रिलपर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी घातल्यानंतर आता अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय कर्मचार्‍यांनाही घरीच बसण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेतील आरोग्य व पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी वगळता उर्वरीत सर्वांना सुटी देण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडण्यास बंदी केली असून, आवश्यकता वाटल्यास तत्काळ बोलवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.
राज्यातील कर्मचार्‍यांची संख्या टप्प्याटप्प्याने घटवत 5 टक्के केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने अत्यावश्यक सेवा सोडून सर्वच कर्मचार्‍यांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागाचे कामकाज नियमितपणे सुरु राहील.
&
’एमटीआर’मंजूर करण्याचे आदेश
राज्य शासनाकडून ऐनवेळी येणार्‍या निधीची मान्यता घेण्यासाठी विभाग प्रमुखांनी महाराष्ट्र कोषागार नियम (एमटीआर) गुरुवारी (दि.26) मंजूर करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाचे कामकाज संपुष्टात आले असून, यापुढे फक्त करोनाच्या निगडीत कामे केली जाणार आहेत.
&
संपर्क क्रमांक मुख्यालयात
जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना सुटी देण्यात आलेली असली तरी त्यांचा मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, ई-मेल आयडी आदी माहिती कार्यालयात ठेवण्याचे आदेश सीईओ बनसोड यांनी दिले आहेत. कोणत्याही क्षणी बोलवल्यास त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही त्यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here