घरCORONA UPDATEघाबरु नका, वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष

घाबरु नका, वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ’चा निष्कर्ष

Subscribe

वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही, असा निष्कर्ष ‘डब्ल्यूएचओ'ने काढला आहे.

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, अत्यावश्यकमध्ये येणाऱ्या वृत्तपत्रांनी देखील कोरोना व्हायरस पसरत असल्याने तो देखील बंद करण्याचा संघटनानी निर्णय घेतला. मात्र, जगभरातील ज्येष्ठ डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या म्हणणनुसार, वृत्तपत्र, नियतकालिक, पत्र अथवा पाकीट आदी छापील माध्यमाद्वारे कोव्हिड-१९ विषाणूचा प्रसार झाल्याची अद्याप एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही, असा निष्कर्ष ‘डब्ल्यूएचओ’ (WHO) काढला आहे.

एखाद्या भागात कोव्हिड-१९ चा प्रसार झाला असेल आणि तेथून आलेले पॅकेज स्वीकारणे सुरक्षित आहे का? यावर ‘डब्ल्यूएचओ’च्या म्हणणनुसार; कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून एखाद्या व्यवसायिक उत्पादन प्रदूषित होण्याची शक्यता कमी असते. तसेच अनेक ठिकाणाहून आलेल्या एखाद्या पॅकेजद्वारे विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त नसतो. कारण एखादी गोष्ट ज्यावेळी काही अंतर पार करुन येते. त्यावेळी तो विषाणू त्या पॅकेजवर राहत नाही. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.

- Advertisement -

अशी घेतली जाते काळजी

  • होम डिलिव्हरी स्टाफला हँड सॅनिटाझर आणि वाईप्स पुरविले जात आहेत. वृत्तपत्र इमारतीच्या बाहेर ठेवण्यात येत आहे.
  • न्यूज स्टँड, डिस्ट्रिब्युटर आणि रस्त्यावर
  • वृत्तपत्र विकणाऱ्यांना हातमोजे, मास्क आणि सॅनिटाझर दिले जात आहेत.

    हेही वाचा – रुग्णालये, दवाखाने, शौचालये आदी ठिकाणीच आता फवारणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -