तिवसा येथे उद्या राष्ट्रीय लोकअदालत

न्यायालयात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या प्रकरणाला सामंजस्याने निकाली काढण्यासाठी शनिवारी ( दि. ८) तिवसा येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Amaravati
Rashtriya Lok Adaalat
तिवसा येथे उद्या राष्ट्रीय लोकअदालत

न्यायालयात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या प्रकरणाला सामंजस्याने निकाली काढण्यासाठी शनिवारी ( दि. ८) तिवसा येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालय तिवसा येथे न्यायालयात प्रलंबित असलेली खावटीची प्रकरणे, चेक बाऊन्सची प्रकरणे, घरगुती वादासंबंधिची प्रकरणे, दिवाणी दावे तसेच तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे अशा सर्व प्रकारच्या प्रकरणांना तसेच दाखल पूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीकरिता ठेवण्यात आलेली आहे. प्रलंबित प्रकरणे आपसी समझोता करून तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधितांनी लाभ घेवून पक्षकारांची दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, जी न्यायालयात प्रलंबित आहे, अशांनी लोक अदालतीला उपस्थित राहून आपली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावी व स्वतः चा वेळ व पैसा वाचवावा, असे आवाहन तिवसा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर तसेच वकील संघाचे अध्यक्ष पी. पी. गाडे व अन्य वकील सदस्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here