घरमहाराष्ट्रअखेर आघाडीने प्रकाश आंबेडकरांसाठी ८ जागा सोडल्या

अखेर आघाडीने प्रकाश आंबेडकरांसाठी ८ जागा सोडल्या

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकांसाठी ८ जागा सोडल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस २०-२० जागांवर निवडणूक लढविणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा सुरु होती. ही चर्चा आता अंतिम टप्प्यावर आली असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून जागा वाटपावरुन भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासी असलेले संबंध ताणले जाताना दिसत होते. दरम्यान, आज आघाडीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी ८ जागा सोडल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी २०-२० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीला दिला होता इशारा

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीकडून १२ जागांची मागणी केली होती. ही मागणी मान्य नाही झाली, तर भारिप सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवेल, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. भारिपने जर खरोखरच सर्व जागांवर निवडणूक लढवली तर याचा सर्वात जास्त फटका आघाडीला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना बसू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून भारिपसाठी चार-चार जागा सोडण्यात आल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी २१ जागांवर तर काँग्रेसने २७ जागांवर निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी

प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत युती करुन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. याच आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांनी आता २० जागांची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यक्रम कल्याण येथे संपन्न झाल. या कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर पहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -