घरमहाराष्ट्रनक्षलवाद्यांकडून शिक्षकाची हत्या, स्थनिकांमध्ये भीती

नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची हत्या, स्थनिकांमध्ये भीती

Subscribe

हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून, कोटगुल पोलीस केंद्रात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यामधल्या कोरची तालुक्यातील ढोलडोंगरीमध्ये कोंबडा बाजारात नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. रविवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. मृत शिक्षकाचे नाव योगेंद्र मेश्राम असून ते गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल विद्या मंदिरात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी याच परिसरात असलेल्या बोटेजरी येथे कंत्राटी आरोग्य सेविकेचे काम करते. मेश्राम दर शनिवारी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी बोटेजरी येथे येत असत. रविवारदेखील ते नेहमीप्रमाणे ढोलडोंगरी येथे भालरलेल्या कोंबड बाजाराला गेले होते. मात्र, त्यावेळी
अचानक काही नक्षलवाद्यांनी तिथे येऊन मेश्राम यांच्यावर गोळीबार केला. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून, कोटगुल पोलीस केंद्रात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


वाचा :‘रमजान’साठी मतदानाच्या तारखा बदला; मुस्लिमांची मागणी

एकाएकी भर बाजारात झालेल्या गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबारामध्ये सुदैवाने अन्य कुणाल दुखापत झाली नाही. दरम्यान, हल्ल्यानंतर जखमी झालेल्या योगेंद्र मेश्राम यांना कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काही वेळातच मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, या हत्येमागे नेमकं काय कारण आहे? नक्षलवाद्यांनी मेश्राम यांनाच का टार्गेट केलं? आता हे नक्षलवादी कुठे पसार झाले आहेत? या सगळ्याचा पोलीस शोध घेत असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -