घरमहाराष्ट्रमनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांवर रंगाची उधळण

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांवर रंगाची उधळण

Subscribe

ठाण्यामध्ये सध्या राजकीय वातावरणाला वेगळा रंग लागताना पाहायला मिळत आहे. ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांवर रंगाची उधळण केली आहे.

ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरणाला वेगळे रंग लागलेले पाहायला मिळत आहे. यात मनसे आणि राष्ट्रवादीचे राजकीय रंग एकत्र झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीच्या रंगाचा गडद परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेवर पडताना पाहायला मिळणार आहे. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू असे जाहीर केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव यांनी एकमेकांना रंग लावला. यावेळी दोघांनी आपला रंग एकच असल्याचे जाहीर झाले. मनसेने आयोजित केलेल्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात आनंद परांजपे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

- Advertisement -

शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आपला पाठिंबा कोणत्या पक्षाला असणार, हे त्यांनी अजून जाहीर केलेले नाही. आज जाधव आणि परांजपे यांच्या भेटीनंतर मनसे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आगामी लोकसभा निवडणुकीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांचेच नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद परांजपे उमेदवारी लढविणार आहेत. त्यामुळे विचारे विरुद्ध परांजपे अशी लढत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -