घरमहाराष्ट्रऔरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

Subscribe

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नावे जाहीर

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे या दोन नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

“विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे,” असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -