बळीराजाला दिलासा देण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

ncp cheif sharad pawar to review situation after heavy rainfall in marathwada
बळीराजाला दिलासा देण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं राज्यात विविध भागात धुमशान घातलं. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. मुसळधार पावसामुळे काही शेतकऱ्याचं काढणीला आलेलं पीक अक्षरशः पाण्याखाली गेलं आहे तर काहीच पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. त्यामुळे बळीराज अडचणीत सापडला आहे. म्हणूनच पुरामध्ये उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसांचा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर बारामती पूरग्रस्त भागातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दौरा कधी करणार?, याकडे राज्यातील जनतेच लक्ष लागलं आहे.

शरद पवार १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवसीय मराठवाडा दौरा करणार आहेत. यादरम्यान तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबादला शरद पवार भेट देणार आहेत. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

काही दिवसांकरिता राज्यात पुन्हा पाऊस गकोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाफील राहू नक आणि प्राणहानी न होण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असा प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

दरम्यान राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाड्यासह कोकणातील शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. राज्यभरात शेतकर्‍यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.


हेही वाचा – ‘मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी ४०० केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा!’