घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या ताफ्यातील गाडीची बाईकस्वाराला धडक; 'त्या' अपघाताची झाली पुन्हा आठवण

शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीची बाईकस्वाराला धडक; ‘त्या’ अपघाताची झाली पुन्हा आठवण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. नागपूरच्या काटोलमधून त्यांनी आपला पाहणी दौरा सुरु केला. थोड्यावेळापूर्वीच भारसिंगीहून खापाकडे जात असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची एका बाईकस्वाराला धडक बसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाईकस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताच्या निमित्ताने शरद पवार यांच्या विदर्भातील एका जुन्या दौऱ्यात झालेल्या अपघाताचीही आठवण झाली. २०१७ साली दुष्काळ दौऱ्यावर असताना पवारांच्या समोरच गडचिरोली येथे भीषण अपघात झाला होता. त्यावेळी पवार यांनी स्वतः खाली उतरून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली होती.

शरद पवार यांना जाणते लोकनेते का म्हटले जाते, याची आज अनेकांना पुनर्प्रचीती आली. गडचिरोली दौऱ्यादरम्यान प्रवास करत असताना…

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ನವೆಂಬರ್ 14, 2017

- Advertisement -

शरद पवार ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नागपूर येथे दौऱ्यावर आहेत. नागपूरहून भारसिंगीवरून खापाकडे जात असताना शरद पवारांच्या ताफ्यातील एका बोलेरे जीपने बाईक स्वाराला धडक दिली. या घटनेत बाईक स्वार जखमी झाला असून त्याच्या बाईकचेही नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. ज्या वाहनाने धडक दिली ते वाहन शरद पवारांच्या वाहनापासून बरेच मागे होते. त्यामुळे शरद पवारांना या अपघाताची माहिती त्याक्षणी मिळाली नाही. मात्र पवारांच्या ताफ्यात सर्वात शेवटी असणाऱ्या रुग्णवाहिकेने जखमी तरुणाला जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.

शरद पवार हे संवेदनशील मनाचे नेते म्हणून ओळखले जातात. दौऱ्यात असताना रस्त्यात एखादा अपघात झाल्यास ते स्वतः उतरुन मदत करताना अनेक प्रसंग घडले आहेत. दौऱ्यात वृद्ध शेतकरी जर निवेदन घेऊन किंवा आपली व्यथा सांगण्यासाठी उभे असल्यास पवार स्वतः गाडी थांबवून त्याची ख्याल खुशाली विचारूनच पुढे जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -