घरताज्या घडामोडीलॉकडाऊन विसंवाद; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर बैठक

लॉकडाऊन विसंवाद; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर बैठक

Subscribe

महाराष्ट्रात जुलै महिन्यातही लॉकडाऊन कायम ठेवल्यामुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन सात महिने झाले आहेत. यातील चार महिने सरकारला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. अजूनही कोरोनाशी दोन हात करण्यातच सरकार व्यस्त आहे. जुलै महिन्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे महाविकास आघाडीत विसंवाद निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. आधी काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीतूनही लॉकडाऊनच्या निर्णयाचे फारसे स्वागत झाले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतरही लॉकडाऊन कायम ठेवलेले आहे. तसे अधिकारी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. हा निर्णय घेत असताना महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा झाली नसल्याची नाराजी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल (२ जुलै) रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला डावललं जात असल्याची खंत काँग्रेस नेते व्यक्त करतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अनेकदा याबाबत उघड नाराजी व्यक्त केलेली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -