घरलोकसभा २०१९तडका वादाचामोदींना कुटुंब माहीत नाही, म्हणून ते इतरांच्या कुटुंबावर टीका करतात - शरद...

मोदींना कुटुंब माहीत नाही, म्हणून ते इतरांच्या कुटुंबावर टीका करतात – शरद पवार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नसल्यामुळे ते आता विरोधकांवरच बरसत आहेत. कालपर्यंत ते गांधी परिवाराला शिव्या घालत होते. आज मला शिव्या घालायला लागले आहेत. म्हणजे मला गांधी घराण्याच्या रांगेत नेऊन बसवले तर… पंतप्रधानांनी पहिली सभा वर्ध्यात घेतली मात्र भाषण आमच्यावरच केले. विषय काय तर पवारांचा कुटुंब कलह आणि अजित पवारांवर कारवाई. मोदींचे स्वतःचे घर नाही. म्हणून त्यांना कुटुंब काय असते, घरात काय परिस्थिती असते हे माहीत नाही. अशात हे दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, हे पाहत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली. आज पुणे जिल्ह्यात आघाडीतील पक्षांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला संबोधित करताना पवारांनी ही टीका केली.

आपल्या कुटुंबाची माहिती देताना पवार म्हणाले की, “माझी आई ही १९३६ साली पुणे बोर्डाची पहिली महिला सदस्या होती. माझा मोठा भाऊ शेती क्षेत्रात काम केले तर एका भावाने माध्यम क्षेत्रात नाव कमावले. एकाच मातेच्या तीन पुत्रांना पद्म पुरस्कार मिळालेले आमचे कुटुंब आहे. आमच्यावर आईचे संस्कार झालेले आहेत. मोदींचे स्वतःचे कुटुंब नाही, घरातले काय करतात, याचा त्यांना पत्ता नाही. कुठेतरी त्यांचे फोटो दिसतात मात्र मोदी इतरांच्या कुटुंबाची चौकशी करतात.”

- Advertisement -

मोदींच्या राजवटीत बळीराजा हतबल झाला आहे. संवेदना नसलेले सत्तेत आहेत. त्यांना बदलण्याशिवाय पर्याय नाही. मोदींनी देशातील अनेक महत्त्वाच्या स्ंस्थांवर हल्ला केला. यातून न्यायालय, सीबीआय आणि प्रसारमाध्यमेही सुटली नाहीत. या संस्थांचे सार्वभौमत्व कायम राहिले पाहिजे. त्यामुळेच भाजपचा पराभव करण हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात नांदेड येथे तिसरी सभा घेतली. या सभेतही त्यांनी शरद पवार आणि काँग्रेसवर पुन्हा एकदा टीका केली. काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. दिवसेंदिवस हे जहाज बुडत चालले आहे. या जहाजात जो बसेल तो राष्ट्रवादी पक्षासारखा बुडत चालला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -