घरमहाराष्ट्रमोहीते पाटलांनी फोन बंद केला आणि आम्हाला उत्तर मिळाले - अजित पवार

मोहीते पाटलांनी फोन बंद केला आणि आम्हाला उत्तर मिळाले – अजित पवार

Subscribe

विजयसिंह मोहीते पाटील यांनी फोन बंद करून ठेवल्यामुळे त्यांचा निर्णय आम्हाला कळला, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

माढा मतदारसंघाची यावेळची निवडणूक नाट्यमय घडामोडींसाठी ओळखली जाईल. विद्यमान खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांनाच राष्ट्रवादी उमेदवारी देईल, असे चिन्ह दिसत असताना शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची गुगली टाकली. पवारांनी पुन्हा माघार घेतल्यानंतर उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. यावर अजित पवार यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. “माढात आम्ही मोहीते पाटील यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी त्यांना पक्षाचा निर्णय कळविण्यासाठी फोन केला होता. मात्र मोहीते पाटील यांचा फोन बंद होता. त्यामुळे आम्हाला त्यांचा निर्णय कळाला”, असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसा पुणे शहरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी मोहीते पाटील यांच्याबाबतचा गौप्यस्फोट केला. तसेच दक्षिण अहमदनगरसाठी आम्ही सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यास तयार होतो. पण माशी कुठे शिंकली, हे कळलंच नाही, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

माझी राज्यसभेची टर्म बाकी असल्याने विजयसिंह मोहीते पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह स्वतः पवारांनी केला होता. मात्र विजयसिंह मोहीत पाटील यांनी उमेदवारीसाठी दुसरेच नाव सुचवले होते. मोहीत पाटील यांनी सुचवलेल्या नावाला माळशिरसचे आमदार वगळता इतर पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा विरोध होता. त्यामुळे पक्षाने मोहीत पाटील यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरला होता. मात्र त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला आणि आम्हाला त्यांचा निर्णय कळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -