घरमहाराष्ट्रदुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Subscribe

अशा शब्दात पवार भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली.

‘राज्यातील अनेक भागात पाणी प्रश्न आताच निर्माण झाला असून त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. मात्र भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करू असे सांगतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे मुहूर्ताची वाट का बघत आहेत?’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्राकांत पाटील यांच्यावर निशाना साधला. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू मेमोरियल हॉल ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तर यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अनेक प्रश्नावर भूमिका देखील मांडली.

काय म्हणाले अजित पवार ?

अजित पवार म्हणाले की, ‘देशातील अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला असताना, हे सरकार एवढा वेळ दुष्काळ जाहीर करण्यास का लावत आहे? यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे. यंदा भूजल पातळी खाली गेली असून त्यामुळे जलयुक्त शिवारची कामे कशा प्रकार झाली आहेत, हे यातून दिसून येत आहे’. जलयुक्त शिवार बाबत केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत असणारा शिवसेना भाजपवर टीका करीत आहे. सत्तेमध्ये असून भाजपवर टीका करणे योग्य नसून भाजप आणि शिवसेना राज्यातील परिस्थितीला जबाबदार असल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे गोंधळलेले राजकारणी’ – विखे पाटील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -