घरमहाराष्ट्रपुन्हा भाजपची मेगाभरती; गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील भाजपवासी होणार

पुन्हा भाजपची मेगाभरती; गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील भाजपवासी होणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. बुधवारी ११ सप्टेंबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करणार आहेत. गणेश नाईक यांच्यासह ५५ नगरसेवक देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. याबरोबरच काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील हे देखील उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील सर्वेसवा गणेश नाईक यांच्या पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. याबाबत अनेक तर्क वितर्क वर्तविण्यात येत असताना अखेर नाईकांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून बुधवारी नेमक्या किती नगरसेवकांबरोबर ते भाजपात प्रवेश करीत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. नाईक यांना केंद्रीय मंत्री किंव्हा पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत करावयाचा होता, पण त्यांच्या तारखा जुळून न आल्याने नाईक बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यक्षेत्रात प्रवेश करीत आहेत.

- Advertisement -

नाईक यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील हे देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याबरोबरच काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आनंद पाटील हे देखील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आनंद पाटील यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. आनंद पाटील १३ स्पटेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कृपाशंकर सिंह यांचाही राजीनामा

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली असताना काँग्रेसला एका मागोमाग एक धक्के मिळत असल्याने चिंता वाढली आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, उर्मिला मांतोडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मंत्री आणि उत्तर भारतीयांचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिल्लीत राजीनामा सोपवला असल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -