मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल! अजितदादांची ‘मन की बात’

Mumbai
ajit pawar says i like to be cm of maharashtra
अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्री व्हायला कुणाला नाही आवडणार!

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले आणि बदलत्या वातावरणात विरोधी पक्षातील अनेकांच्या सत्तेत येण्याच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. यातच मनसेचे राज ठाकरे यांनी या निवडणुकीच्या प्रचारात आणलेली रंगत विरोधी पक्षांना ताकद देत असल्याचे लक्षात घेऊन विरोधक अधिकच उत्साहात आहेत. याचाच भाग राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचे व्यक्त केलेले मत.

अजित पवार म्हणातत:

“राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाचे एक स्वप्न असते. आपल्याला कारभार करता आला पाहिजे. निर्णय घेता आला पाहिजे. आमच्यापैकी प्रत्येकाला वाटत असते. मला मुख्यमंत्री पदावर जायला निश्चितच आवडेल. पण फक्त मला आवडून चालणार नाही. आमच्या आघाडीने मॅजिक फिगर ओलांडली आणि जनतेने जर निवडून दिले तर शक्य आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी आपणही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. यावेळी मतदान करून बाहेर आल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी, सर्व जनतेने ज्यांच्या हातात ही ताकद दिली आहे, ज्यांच्या मतामध्ये तो अधिकार आहे. ते ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार. जे चांगले काम करतील, निवडून आलेल्या आमदारांचा विश्वास संपादन करतील, जनतेचा विश्वास जिंकतील. ते मुख्यमंत्री होतील. मी पण मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रयत्न करेन. मला मुख्यमंत्री करायचे की नाही ते शेवटी जनताच ठरवेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकींच्या कामासाठी लागणार आहे. तसेच बारामतीत भाजपचा विजय झाल्यास आपण राजकारणामधून निवृत्ती घेऊ असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मन की बात बोलून दाखवली तेव्हा कार्यकर्त्यांत जोश आला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here