घरमहाराष्ट्र'पाकिस्तानला धडा शिकवून झाला?' सेना-भाजप युतीवर धनंजय मुंडेंचा सवाल

‘पाकिस्तानला धडा शिकवून झाला?’ सेना-भाजप युतीवर धनंजय मुंडेंचा सवाल

Subscribe

शिवसेना-भाजप युतीनंतर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली असून युतीची घोषणा होताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्वीटवर टोकदार टीका केली आहे.

शिवसेना-भाजप यांच्यामध्ये युती होणार की नाही? या प्रश्नावर गेल्या महिन्याभरापासून खलबतं सुरू होती. कारण गेल्या सुमारे वर्षभरापासून या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे युतीचं काय होणार? यावर तर्क-वितर्क लढवले जात होते. शिवसेना नेते आणि नेतृत्व देखील जाहीर सभांमधून स्वबळाच्या भाषा करत असताना ही चर्चा होणं स्वाभाविकच होतं. मात्र, आता त्या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केली आहे. आता त्यावरच विरोधकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर या युतीच्या संदर्भात तिखट शब्दांत टीका केली आहे.

‘…तर युती होणे स्वाभाविकच नाही का?’

युतीची घोषणा झाल्यानंतर लगेचच धनंजय मुंडेंनी ट्वीटरवरून त्यावर टीका केली आहे. यासोबत त्यांनी एक उपहासात्मक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली? अयोध्येत राम मंदिरही बनवून झाले? नाणारही बुडवला? उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाकला धडा देखील शिकवून झाला? इतकेच काय, तर पहारेकरी आता नीट ड्युटी करू लागला आहे? ‘तेरे मेरे सपने मिले’ मग युती होणे स्वाभाविकच नाही का?’ असा उपरोधिक सवाल धनंजय मुंडेंनी केला आहे. त्यासोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर विरोधकांनी यावर परखड टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर पेजवरून देखील युतीच्या घोषणेवर चारोळ्यांच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -