Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या - शरद पवार

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या – शरद पवार

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने घाईघाईत आणि कुणालाही विश्वासात न घेता मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. ‘संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा’ या झेंड्याखाली राज्यातील १०० हून अधिक संघटना एकत्र आल्या असून मुंबईत २४ ते २६ जानेवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार देखील सहभागी होणार आहेत. येत्या २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला ते उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, त्याचप्रमाणे या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शरद पवार यांचे आवाहन

सोशल मीडियाचा वापर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचवण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडूनही केला जात आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावत सोशल मीडियावर अभिनव पद्धतीने लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ही फ्रेम लावल्यामुळे ग्रामीण भागातली तरुणाई उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी होत आहे.

- Advertisement -

दिल्ली येथील आंदोलनाला ५०हून अधिक दिवस लोटले आहेत. तरीही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील पाठिंबा दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून सत्तेतील तीनही पक्ष या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत.

येत्या २५ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला खासदार शरद पवार संबोधित करणार आहेत. तर दिल्लीतील आंदोलनाला सोशल मीडियावरून सामान्य जनतेचा पाठिंबा लाभला आहे, तसाच पाठिंबा राज्यातूनही मिळावा यासाठी शरद पवार यांच्याकडून सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी; ३० जानेवारीला परिषद होणार


 

- Advertisement -