घरमहाराष्ट्रसुशांतसिंह प्रकरणात सीबीआयने लावलेल्या दिव्यांचा प्रकाशच दिसला नाही - शरद पवार

सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयने लावलेल्या दिव्यांचा प्रकाशच दिसला नाही – शरद पवार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण बाजूला राहिलं असून इतर गोष्टीच समोर येत आहेत. यावरुन, चौकशी करणारी यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयने लावलेल्या दिव्यांचा प्रकाशच दिसला नाही, असं शरद पवार म्हणाले.

एका कलाकाराने आत्महत्या केल्याचं वाचलं होतं. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र केंद्र सरकारचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही आहे म्हणून त्यांनी या प्रकरणाचा तपास वेगळ्या एजन्सीकडे दिला. मात्र, या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळाला नाही, असा खोचक टोला पवारांनी लगावला. हे प्रकरण राहिलं बाजूला दुसरंच बाहेर येत आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जूनला राहत्या गळफास घेत जीवन संपवलं. मात्र, त्याचा मृत्यू बॉलिवूडच्या घराणेशाहीमुळे आणि कंपूशाहीमुळे गेला अशी चर्चा सुरु झाली. अनेक बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणावतने सुशांतची आत्महत्या नसून खून आहे असा दावा केला. यावरुन बरंच वादंग उठलं. यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -