घरमहाराष्ट्रगाफील राहू नका, सत्ताधारी कुठल्याही थराला जातील - अजित पवार

गाफील राहू नका, सत्ताधारी कुठल्याही थराला जातील – अजित पवार

Subscribe

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशी सत्ताधाऱ्यांना चटक लागली आहे. हे काहीही करतील कुठल्याही थराला जातील

पिंपरी-चिंचवडमध्ये दलित पँथरच्या मावळ लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. गाफील राहू नका सत्ताधाऱ्यांकडून साम दाम दंड भेद याचा वापर केला जाईल. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशी सत्ताधाऱ्यांना चटक लागली आहे. हे काहीही करतील कुठल्याही थराला जातील, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना जाहीर मेळाव्यात नागरिकांना आवाहन केले आहे.

- Advertisement -

गाफील राहू नका साम दाम दंड भेद याचा वापर केला जाईल. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता अशी सत्ताधाऱ्यांना चटक लागली आहे. ते काहीही करतील कुठल्याही थरारा जातील. मात्र, आपल्याला आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून वाटचाल करत काम करायचे आहे, असे अजित पवार जाहीर मेळाव्यात म्हणाले.

देशातील अनेक समाज भयभीत

पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले, परंतु अपेक्षे प्रमाणे मतदान झाले नाही. देशात हुकूमशाही आणि म्हणेल तीच पूर्व दिशा अशा प्रकारचा कारभार सुरू आहे. याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. कोरेगाव येथे झालेली घटना का आणि कोणी घडवली याच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे, कुठे पाणी मुरतय, हे सर्व जनतेच्या पुढे का येत नाही. असा प्रश्न देखील यावेळी, अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार असे देखील म्हणाले की, देशातील अनेक समाज भयभीत होऊन आयुष्य जगत आहेत. कोणी कसे जगावे आणि कसे राहावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -