घरमहाराष्ट्रसत्तेच्या ४ वर्षात राममंदिर का झाले नाही? - राष्ट्रवादी

सत्तेच्या ४ वर्षात राममंदिर का झाले नाही? – राष्ट्रवादी

Subscribe

भाजप शिवसेनेचा मित्रपक्ष आहे पण शिवसेना आपले विचार असे मांडते की, की भाजप त्यांचा मित्रपक्ष नाही तर शत्रूपक्ष आहे आणि सत्ता सोडत नाही. हे कसलं राजकारण?', असा संतप्त सवालही आ. टकले यांनी केला. 

शिवसेनेचा दसरा मेळावा नुकताच दादर येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये अयोध्येत राममंदीर बनवण्याचा मुद्दा सेनेने उपस्थित केला होता. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी जोरदार शिवसेना आणि भाजपवर टीका केली. ‘चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करण्याऐवजी तो तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल’, असा आरोप आमदार टकले यांनी मिडियाशी बोलताना केला. ‘लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख रोज एक नवीन भाषण देत असतात. त्यात एखादा नवीन विषय आणला जातो. त्यामध्ये देशाचे किंवा राज्याचे हित नसतेच. भाजप शिवसेनेचा मित्रपक्ष आहे पण शिवसेना आपले विचार असे मांडते की, की भाजप त्यांचा मित्रपक्ष नाही तर शत्रूपक्ष आहे आणि सत्ता सोडत नाही. हे कसलं राजकारण?’, असा संतप्त सवालही आ. टकले यांनी यावेळी उपस्थित केला. 


खुशखर: आता रेल्वेमध्ये बुक करा 2BHK फ्लॅट


हा सगळा लहान मुलांचा खेळ

‘देशातील आणि राज्यातील सामान्य नागरिक हैराण झाला आहे. आज देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, लोकांच्या काय समस्या आहेत, लोकांना असुरक्षित वाटत आहे, मॉब लिचिंगचे प्रकार होत आहेत. यासह प्रत्येक क्षेत्रात विदयार्थी खूष आहेत ना शेतकरी खूष आहेत. हा सगळा फक्त दिखावा सुरु आहे. आम्ही हे करु ते करु, रामराज्य आणू… तुम्हाला चार वर्ष दिली ना जनतेने मग का नाही आणलं? हा सगळा लहान मुलांचा खेळ सुरु आहे. ही मनोहरी कहानी आहे ज्याचा लोकांना आता त्रास होवू लागला आहे’, अशी जोरदार टिकाही आ. टकले यांनी केली.

- Advertisement -
NCP Hemant Takle
राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले

देश आणखी मागे जाईल

‘देशात, राज्यात इतक्या मोठया गंभीर समस्या आहेत पण त्याकडे यांचे लक्ष नाही. त्यांचा ब्युरोक्रसी आणि व्यवस्थापनावर कंट्रोल राहिलेला नाही. मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये एकत्र बसतात आणि यांना एकमेकांना माहित नाही काय घडत आहे. याप्रकारचं राजकारण सुरु राहिलं तर संपूर्ण राज्य आणखी १०-१५ वर्ष मागे जाईल’, अशी भीतीही आ. टकले यांनी व्यक्त केली. राज्यातील जलयुक्त शिवारसारखी योजना फसली आहे. त्याची आज स्थिती काय आहे, किती तलावामध्ये पाणी उपलब्ध आहे, किती गावात टॅकर सुरु आहेत आणि ही वास्तवता आहे. लोकांच्या भावनेशी हे सरकार खेळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांना कधी माफ करणार नाही’, असा इशाराही आ. टकले यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -