घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

Subscribe

विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपचे आमदार डाॅ. अशोक उइके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने झिरवाळ बिनविरोध निवडून आले.

विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपाकडूनही अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून आज अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आदींसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही नरहरी झिरवाळ याचे अभिनंदन केले.

- Advertisement -

अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड

या निवडीनंतर झिरवाळ यांना सन्मानपूर्वक सभागृहातील उपाध्यक्षपदाच्या आसनाकडे नेऊन स्थानपन्न करण्यात आले.
उपाध्यक्षपदासाठी झिरवाळ यांच्यासह भाजपचे आमदार डाॅ. अशोक उइके यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी आज दुपारी माघारीच्या मुदतीत आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे झिरवाळ यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. विधानसभा सदस्य म्हणून झिरवाळ यांची ही तिसरी टर्म आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे प्रितनिधीत्व करतात. यापूर्वी ते २००४ आणि २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -