घरCORONA UPDATE'तरूणांना कामाला यायचं आहे, पण एसटी नाहीये', रोहित पवारांनी मांडली व्यथा!

‘तरूणांना कामाला यायचं आहे, पण एसटी नाहीये’, रोहित पवारांनी मांडली व्यथा!

Subscribe

एसटी सुरू करण्याचा निर्णय अजूनही सरकारने घेतलेला नाही. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात गावाकडे अडकलेले नागरिक एसटीची वाट बघत बसले आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी हा एकमेव आधार आहे. पण या लॉकडाऊनमध्ये एसटीची आणखी किती काळ वाट पहावी लागणार असच दिसतय. लॉकडाऊनमध्ये बंद झालेली एसटी अजूनही सुरू न झाल्यामुळं नागरिक चिंतेत आहेत. नागरिकांच्या मनातील हीच खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ट्विट करून व्यक्ती केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एसटी पुन्हा एकदा धावू लागेल आणि ‘गाव तिथे एसटी’ हे चित्र पुन्हा दिसेल, अशी आशा होती. मात्र, एसटी सुरू करण्याचा निर्णय अजूनही सरकारने घेतलेला नाही. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात गावाकडे अडकलेले नागरिक एसटीची वाट बघत बसले आहेत.

- Advertisement -

रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी लोकांना एसटीचं साधन उपलब्ध नाही. त्यामुळं कंपन्यांमध्ये कामास येण्याची इच्छा असूनही तरुणांना येता येत नाही. या पार्श्वभूमीवर आताच्या परिस्थितीत एसटी प्रवासासाठी कोरोना धोरण राबवता येऊ शकतं, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी यात व्यक्तिश: लक्ष घालावं,’. अशी विनंतीही त्यांनी ट्विटमध्ये केली आहे.

- Advertisement -

तीन महिने घरात राहिल्यानंतर लोकांनाही आता कामाची गरज भासू लागली आहे. त्यांनाही शहराकडे परतायचे आहे. राज्यातील कामगारांना शहरात येण्यासाठी एसटी बस हेच प्रमुख आणि परवडणारे साधन आहे. खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याने तो पर्याय अनेकांना परवडणारा नाही. त्यामुळे एसटी कधी चालू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


हे ही वाचा – प्रेमात अडथळा होणाऱ्या पतीला शॉक देऊन पत्नीने केली हत्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -