घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंच्या संपत्तीमध्ये २७ कोटींनी वाढ

सुप्रिया सुळेंच्या संपत्तीमध्ये २७ कोटींनी वाढ

Subscribe

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. या अर्जात त्यांनी एकूण १४० कोटी ८८ लाख ८८ हजार ७०२ रुपयांची मालमत्ता असल्याचे शपथपत्र जमा केले आहे. वर्ष २०१४ चा विचार केल्यास सुळेंच्या संपत्तीमध्ये तब्बल २६ कोटी ८८ लाख ८८ हजारांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. २०१४ साली त्यांची एकूण संपत्ती ही ११३ कोटी ८७ लाख असल्याचे त्यांनी सांगितले होते.

हे वाचा – बोलता येत असेल तरच बोला; नाहीतर काही खैर नाही – अजित पवार

- Advertisement -

आज निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात स्वतःच्या नावावर ३९ कोटी ६७ लाख ३६ हजार असल्याचे सांगितले आहे. हेच २०१४ साली त्यांच्या स्वतःच्या नावावर ३१ कोटी ६२ लाखांची संपत्ती होती. यावेळी त्यांनी पतीच्या नावावर ८८ कोटी ११ लाख ३० हजार, मुलगी रेवतीच्या नावे ८ कोटी ९२ लाख ८ हजार तर मुलगा विजयच्या नावे ४ कोटी १८ लाख १३ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -