घरमहाराष्ट्र'फक्त फसवू नका', उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं!

‘फक्त फसवू नका’, उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं!

Subscribe

उदयनराजेंचा स्वभाव आणि त्यांना साताऱ्यातूनच स्थानिक राष्ट्रवादीच्या गोटातून होत असलेला विरोध, या पार्श्वभूमीवर शनिवारी शरद पवार यांनी उदयनराजेंची सातारा गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. सुमारे तासभर झालेल्या या भेटीमध्ये नेमकं काय शिजलं?

आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि मनमर्जी स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या उदयनराजेंनी आता थेट मोठ्या पवारांवर अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. त्यांनी थेट पवारांनाच ‘फसवाफसवी करू नका’, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातले स्थानिक कार्यकर्ते आणि एकूणच पदाधिकारी उदयनराजेंच्या अजूनच विरोधात जाण्याची शक्यता आहे. शिवाय, उदयनराजेंच्या या उद्धटपणावर शरद पवार काय भूमिका घेतात? याकडेही फक्त राष्ट्रवादीतल्याच नाही तर एकूणच सर्वच पक्षांमधल्या जाणकार मंडळींचं लक्ष आहे.

का सुनावलं उदयनराजेंनी?

उदयनराजेंचा स्वभाव आणि त्यांना साताऱ्यातूनच स्थानिक राष्ट्रवादीच्या गोटातून होत असलेला विरोध, या पार्श्वभूमीवर शनिवारी शरद पवार यांनी उदयनराजेंची सातारा गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. सुमारे तासभर झालेल्या या भेटीमध्ये नेमकं काय शिजलं? याचा तपशील जरी बाहेर येऊ शकलेला नसला, तरी भेटीतून बाहेर आलेल्या उदयनराजेंनी मात्र माध्यम आणि राजकीय विश्वात चर्चा सुरू करणारं विधान करून सगळ्यांनाच अचंबित करून टाकलं.

- Advertisement -

काय म्हणाले उदयनराजे?

सातारा गेस्ट हाऊसमधून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी नेहमीप्रमाणे उदयनराजेंना गराडा घालत आतमध्ये काय झालं? याविषयी विचारणा केली. त्यावर ‘पवारांनी फसवाफसवी करू नये’, अशा शब्दांत उदयनाराजेंनी प्रतिक्रिया दिली.

उदयनराजेंचे शब्द…

शरद पवार…आज त्यांचं वय पाहाता…एवढा मोठा कोण नेता आहे का?..आपल्या सगळ्यांना लाजवेल एवढी धावपळ करत असतो…काय बोलायचं त्या माणसाशी?…ठीक आहे…म्हटलं फसवाफसवी करू नका फक्त..नाहीतर आपल्याला पण कळतं.

राष्ट्रवादीतूनच उदयनराजेंना विरोध

दरम्यान, उदयनराजेंच्या या प्रतिक्रियेचे आता उलट-सुलट अर्थ लावले जात आहेत. उदयनराजे जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर साताऱ्यातून खासदारकी निवडून आले असले, तरी साताऱ्यात मात्र त्यांचाच पगडा असतो हे उघड वास्तव आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उदयनराजेंचे चुलत भाऊ शिवेंद्र राजे भोसले यांच्यातला वादही जगजाहीर आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवरच शरद पवारांनी उदयनराजेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. तसेच, पवार काय म्हणाले? या प्रश्नावर उदयनराजेंनी ‘तुम्ही आपलेच आहात, असं म्हणाले’, अशी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेवरच भेटीमध्ये चर्चा झाल्याचं समर्थन करते. मात्र, त्यानंतर त्यांनी दिलेला इशारा अधिक चर्चा घडवून आणणारा आहे.

- Advertisement -

‘फसवाफसवी केली तर आम्हाला पण कळतं’

उदयनराजेंनी दिलेल्या ‘…नाहीतर आम्हाला पण कळतं’ या इशाऱ्यावर त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या शक्यतेचं गृहीतक आधारलेलं आहे. शिवाय, नक्की उदयनराजे कोणत्या फसवा-फसवीविषयी बोलत होते, यावर देखील सध्या राष्ट्रवादीतून सोयीस्कर मौन पाळलं जात आहे.

डीजेवर उदयनराजे आक्रमक

दरम्यान, या भेटीमध्ये उदयनराजेंच्या डीजेविषयीच्या भूमिकेवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र, ‘साताऱ्यात डीजेचा दणदणाट होणारच’, या भूमिकेवर उदयनराजे ठाम आहेत. त्यांच्या या निर्धारानंतर कोल्हापूर विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एकूणच ‘डीजेच्या मुद्द्यावर आम्हाला उचकवू नका’, अशी दिलेली सूचक प्रतिक्रिया गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी साताऱ्यात काय वाढून ठेवलेलं असू शकतं, याची कल्पना देणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनी उदयनराजेंना ‘सबुरीचा सल्ला’ दिला का? असं सध्या बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -