घरमहाराष्ट्रभीमा-कोरेगावमध्ये भिडे, एकबोटेंनी वेगळे वातावरण निर्माण केले

भीमा-कोरेगावमध्ये भिडे, एकबोटेंनी वेगळे वातावरण निर्माण केले

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप

भीमा-कोरेगावमध्ये लोक अभिवादनासाठी जमत असतात. अनेक वर्षांपासून हे होत आले आहे. तिथं बाहेरून येणार्‍यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये कधीही कटुता नव्हती. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी तिथे वेगळे वातावरण निर्माण केले,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत केला.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारला देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारित स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केले.

- Advertisement -

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही वेगळी प्रकरणे आहेत. एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमाशी संबंध जोडण्यात आला. इतकंच नव्हे, तर त्या परिषदेला हजर नसलेल्या लोकांनाही त्यात गोवण्यात आले आहे. त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. मागील सरकारने अधिकारांचा गैरवापर करून हे प्रकरण हाताळले आणि काही पोलिसांनी त्यांना साथ दिली. त्याबद्दल आमची तक्रार असून पोलिसांच्या आक्षेपार्ह वर्तनाची चौकशी झालीच पाहिजे.

तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील. राज्य सरकारकडे आमचे म्हणणे आम्ही लेखी मांडले आहे. आता सरकार काय करेल ते करेल. पण मागच्या सरकारने जे केले ते लोकांसमोर यायला हवे, असे पवार म्हणाले.
राज्याचे निर्णय केंद्राला कसे कळतात

- Advertisement -

एल्गार परिषदे प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. मी सरकारला पत्र लिहून एल्गार परिषदेची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी एल्गार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता होता. त्यानंतर अवघ्या चार तासांत केंद्रीय तपास पथकाने (NIA) ने एल्गारचा तपास स्वतःच्या हातात घेतला. या प्रकरणात दिल्लीने एवढी तत्परता का दाखवली? एसआयटी स्थापन करण्याबाबत दिल्लीला माहिती कुणी पुरवली? सरकारने घेतलेले निर्णय दिल्ली कळविले जात आहेत का? याचा तपास आता राज्य सरकारने करावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -