घरमहाराष्ट्रमाझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये - शरद पवार

माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये – शरद पवार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. या टीकेवर आज शरद पवारांनी प्रत्योत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेले टीकेचे उत्तर पवार यांनी दिले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात त्यांनी मोदींवर टीका केली. माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये अशा शब्दात त्यांनी मोदींना खडे बोल सुनावले आहे. भाजप पक्ष फक्त एकाच माणसाच्या मागे आहे तसा राष्ट्रवादी नाही. राष्ट्रवादी पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे ते म्हणाले. मोदींची सभा झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत मोदींवर नवाब मलिक यांनी टीका केली होती.

काय म्हणाले शरद पवार

“अजित पवार हे उत्तम नैतृत्व करतील. माझी आई कोल्हापूरची माझ्यावर योग्य संस्कार झाले आहेत. इंदिरा गांधी यांनी पाकला धडा शिकवून इतिहास नाही भूगोल घडवला आहे.  मोदी कुठेही गेले तरी ते गांधी परिवारावर पहिला हल्ला करतात. भाजप फक्त एकाच व्यक्तीचा पक्ष असल्याचे चित्र आहे. देशाचं पंतप्रधानपद म्हणजे एक संस्था आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. मोदींनी माझ्या कुटुंबाबद्दल चिंता करू नये.” – राष्ट्रवादीचे अध्यक्ष, शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -