घरCORONA UPDATECorona Update: चिंताजनक! राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Corona Update: चिंताजनक! राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात ११,५१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४,७९,७७९ झाली आहे. राज्यात १,४६,३०५ Active रुग्ण आहेत. राज्यात ३१६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६,७९२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.

राज्यात ३१६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५७, ठाणे ३८, नाशिक १३, जळगाव १३, पुणे ४३, पिंपरी चिंचवड १९, सोलापूर १५, कोल्हापूर १३, नागपूर १८ यांचा समावेश आहे. आज १०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३,१६,३७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४,८७,९९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,७९,७७९ (१९.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,७६,३३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -