‘दादा मी प्रेग्नंट आहे’ नंतर पुण्यात पुन्हा पोस्टबाजी

'दादा मी प्रेग्नंट आहे' नंतर पुण्यात पुन्हा पोस्टबाजी सुरु झाली आहे. आता पुण्यात 'जा तून स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही' अशी पत्रक लावण्यात आली आहेत.

Pune
new posters in pune after dada me pregnant ahe poster
पुण्यात 'जा तून स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही' ची पोस्टरबाजी

काही दिवसांपूर्वी पुण्यात ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ अशी पोस्टरबाजी करण्यात आली होती. या पोस्टरमुळे अनेकांनी तर्कवितर्क काढले होते. मात्र अखेर हे गुपित उलगडले. हे गूढ उकलले असतानाच आता पुन्हा एकादा पुण्यात पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर पुण्यातील अनेक भागांत लावले गेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उढाण आले आहे. पुण्यातील हडपसरमध्ये एक पत्रक लावण्यात आले आहे. यामध्ये ‘जा तून स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’ असे पत्रक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. ही लावण्यात आलेली पत्रक प्रेमभंगातून लावण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. या पत्रकामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रेमभंगातून पत्रकबाजी

हडपसर परिसरात बुधवारी सकाळी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर पत्रके लावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पत्रकांमध्ये एका तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहीण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात लावण्यात आलेली सर्व पत्रके काढून टाकली आहेत. तसेच ज्या अज्ञात व्यक्तींनी ही पत्रके लावली आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पत्रकावरुन आकाश, स्वप्नाली आणि शैलेश या तीन नावांचा उल्लेख केला असून ही पोस्टरबाजी प्रेमभंगातून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.


वाचा – स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेने सांगितले धम्माल किस्से


असे लिहले आहे पत्रकात

स्वप्नाली आणि मी महाविद्यालयामध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर आम्ही घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न देखील केले. मात्र स्वप्नालीचे माझ्या आईशी पटत नसल्याने ती मला सोडून गेली आहे. तसेच आता स्वप्नाली शैलेश या तरुणाशी लग्न करत असून ती हे लग्न पैशांसाठी करत आहे. असे नवरा – बायकोचं नाते सोडून कोणी जातं का? जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार? तू कुठेही जा स्वप्नाली मी तुला राहूच देणार नाही, असे या पत्रकात या तरुणाने म्हटले आहे.


वाचा – ‘ही’ होती उमेश आणि प्रियाची गुड न्यूज