अखेर सामाजिक संस्थेने घेतली शिवसेनेने लावलेल्या झाडांची जबाबदारी

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्ताने २० जुलै २०१८ रोजी अंबरनाथ येथील खुंटवली डोंगर माथ्यावर ५८ हजार झाडे लावण्यात आले होते. मात्र, यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त वृक्ष नष्ट झाले आहेत.

Ambernath

शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षरोपण मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमेअंतर्गत ५८ हजार झाडे लावण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अर्ध्यापेक्षा जास्त वृक्ष नष्ट झाले आहेत. यापैकी काही जेमतेम तग धरून आहेत. आता या वृक्षांना संजीवनी देण्यासाठी ‘टीम द युवा’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्ताने २० जुलै २०१८ रोजी अंबरनाथ येथील खुंटवली डोंगर माथ्यावर ५८ हजार झाडे लावण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ६ हजार स्वयंसेवक आणि अंबरनाथचे ४ हजार नागरिक उपस्थित होते. मात्र या वृक्षांची देखभाल न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षांचे नुकसान झाले आहे.

२५ हजार वृक्षांचे संवर्धन

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ‘टीम द युवा’ या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष योगेश चलवादी आणि त्यांच्या ३५ सहकाऱ्यांनी या वृक्षांना संजीवनी देण्याची जबाबदारी घेतली. ही संघटना टाकाऊ प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून ठिबक सिंचनाची निर्मिती करणार आहेत. त्यांनी जवळपास ४५० रोपांजवळ ही प्रक्रिया सुरू केली. आता नियमितपणे या झाडांचे संगोपन करण्यात येणार असून या परिसरातील २५ हजार वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे योगेश यांनी सांगितले. युवासेना अधिकारी निखिल वाळेकर यांनी या मोहिमेत टँकरने डोंगराच्या कानाकोपऱ्यात वृक्षांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी घेतली आहे. वन अधिकारी नारायण माने यांनी देखील सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here