घरताज्या घडामोडीरायगडच्या जिल्हाधिकारी पदी निधी चौधरी

रायगडच्या जिल्हाधिकारी पदी निधी चौधरी

Subscribe

मंगळवारी निधी चौधरी यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. निधी चौधरी यांची रायगड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेला बदल्यांचा धडाका पुन्हा एकदा कायम राहिला आहे. बहुचर्चित आरे कारडेशड प्रकरणी अश्विनी भिडे यांची बदली केल्यानंतर बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांची बदली रायगडच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. चौधरी यांच्या बदलीचा निर्णय मंगळवारीच घेण्यात आला असून चौधरी यांनी बुधवारी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार निधी चौधरी यांची बदली मंगळवारी करण्यात आली आहे. चौधरी या २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील एक अधिकारी म्हणून निधी चौधरी यांचे नाव घेतले जात होते.

मुंबईत प्लास्टिक बंदी करण्यात यशस्वी भूमिका बजाविली

गेल्या काही महिन्यांपूर्वी निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल ट्विट केल्याने बराच वाद झाला होता. या वादाला राजकीय वळण देखील आले होते. त्यानंतर मुंबईत प्लास्टिक बंदी करण्यात यशस्वी भूमिका बजाविली होती. निधी चौधरी यांची बदली रायगड जिल्हाधिकारी पदी केली असतानाच त्या जागी असलेले डॉ. एन.बी.गिते यांची बदली मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिसारण विभागाच्या उपसचिव पदावर करण्यात आली आहे. डॉ. गिते हे २००९ आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.

- Advertisement -

निधी चौधरी मूळच्या राजस्थानच्या 

दरम्यान, रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निधी चौधरी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख निधी चौधरी यांची आहे. त्यांनी मुंबई महापालिकेत उपायुक्त, उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळलेल्या चौधरी यांनी रायगड जिल्ह्यात पेणच्या प्रांताधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. आयएएस अधिकारी होण्यापूर्वी त्या २००८ मध्ये रिझर्व्ह बँकेत कार्यरत होत्या. मूळच्या राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यातील डिडवानाच्या त्या रहिवासी आहेत. जयपूरमध्ये त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन विषयात पी. एच. डी. संपादन केली. रायगडात येण्यापूर्वी पाणी पुरवठा आणि जलनिःस्सारण विभागाच्या उपसचिव म्हणून कार्यरत होत्या.


हेही वाचा – VIDEO : उल्हासनगरमधील ‘त्या’ मर्डर केसच्या आरोपींना अखेर बेड्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -