घरताज्या घडामोडीजेवण नको, अंघोळ नको, शेवटची कोणतीही इच्छा नाही

जेवण नको, अंघोळ नको, शेवटची कोणतीही इच्छा नाही

Subscribe

आम्हाला तुम्ही जेवायला देत आहात, आम्हाला शेवटचं जेवण नकोय, आम्ही अंघोळही करणार नाही, आम्हाला आज झोपही येत नाही… अशा भावना निर्भयाच्या चारही आरोपींच्या फाशीच्या आधी होत्या. निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्यांनी फाशी देण्याआधी कोणतीच इच्छा व्यक्त केली नव्हती. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) ने या वृत्ताला दुजोरा देत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्विट केले आहे. निर्भया प्रकरणातील मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग चारही दोषींना आज सकाळी ५.३० वाजता अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली. पण फाशीआधी कोणतीही इच्छा चारही दोषींनी व्यक्त केली नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आपल्या अमानुष कृत्याची कदाचित जाणीव झाल्यानेच चारही आरोपींपैकी एकानेही शेवटची इच्छा व्यक्त केली नसावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मग झाली फाशी
सकाळी ५.२३ वाजताच डोक्यावर चारही दोषींना फाशी घऱामध्ये उभे कऱण्यात आले होते. त्यानंतर ५.२८ वाजता त्यांच्या डोक्यावर काळा कपडा बांधण्यात आला. त्यावेळी त्यांचे दोनही हात मागे बांधण्यात आले होते. बरोबर ५.३० वाजता या चौघांनाही एकाचवेळी फाशी देण्यात आली. याआधी ५ मार्च रोजी त्यांच्या नावे शेवटचं डेथ वॉरंट पतियाला कोर्टाने काढलं होतं. आज पहाटे ५.३० वाजता त्या चौघांनाही फाशी दिली गेली.

- Advertisement -

दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये एका तरुणीवर पाशवी बलात्कार झाला आणि त्यामुळे आख्खा देश पेटून उठला. देशभर झालेल्या आंदोलनांमधून त्या तरूणीला निर्भयाची उपमा मिळाली. १३ दिवसांनंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला आणि उभा देश हळहळला. पण तिच्या मृत्यूनंतर तब्बल ७ वर्षांनी निर्भयाला न्याय मिळाला अशीच भावना आज उपस्थितांकडून समोर आली.

अशी होते फाशीची शिक्षा

फाशीच्या एक तास आधी दोषीला अंघोळ करण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याला नवे कपडे दिले जातात. कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्याचा चेहरा काळ्या कापडाने झाकला जातो. दोन्ही हात मागे बांधले जातात. ज्या ठिकाणी फासावर लटवले जाणार आहे तिथे नेले जाते. त्याच्या भावना जाणून घेतल्या जातात. ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा कारागृहातल्या अन्य कैद्यांना कोठडीतच ठेवले जाते. त्यांना बाहेर येण्यास मनाई असते.

- Advertisement -

फाशी प्रक्रियेसाठी यांची उपस्थितीत असते

फाशी देताना तुरुंग अधीक्षक आणि उपअधीक्षकांची उपस्थिती अनिवार्य असते. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतो. प्रत्यक्ष फाशी देताना नातेवाईकांना उपस्थित राहण्यास मनाई असते. संशोधक, मनोवैज्ञानिक यावेळी तुरुंग अधिक्षकांच्या परवानगीने उपस्थित राहू शकतात. जल्लादाच्या साहाय्याने फाशी दिली जाते. आदेश येताच संदुक ओढला जातो व आरोपीला फासावर लटकवण्यात येते. हा मृतदेह जवळपास अर्धा तास तशाच स्थितीत लटकवण्यात येतो. त्यानंतर खाली उतरवून त्याची तपासणी वैद्यकीय अधिका-यांमार्फत होते. तो मृत झाल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह कैद्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -