घरमहाराष्ट्रNisarg Cyclone : मुक्या प्राण्यांची मदत करा

Nisarg Cyclone : मुक्या प्राण्यांची मदत करा

Subscribe

चक्रिवादळात मुक्या प्राण्यांना आसरा द्या, असं आवाहन प्राणीप्रेमींनी केलं आहे.

आज निसर्ग चक्रिवादळ महाराष्ट्रावर धडकणार आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे मुके प्राणी घाबरुन ते तुमच्या घरात, कॉलनीत आसरा घ्यायला येतील. तर त्यांना घरात, कॉलनीत घ्या. त्यांना असरा द्या, असं आवाहन प्राणीप्रेमी करत आहेत. चक्रिवादळाचा फटका माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांना देखील बसणार आहे.

याशिवाय, चक्रिवादळामुळे समुद्र किनाऱ्यांवर कासव, डॉल्फिन, व्हेल किंवा सागरी जीव वाहून येऊ शकतो. जर तुम्हाला असं काही निदर्शनास आलं तर याबाबतची माहिती वनविभाग खात्याला द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. आज निसर्ग चक्रिवादळ धडकणार असून ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे घाबरलेले मुके जीव आसरा घ्यायला आले तर त्यांना हाकलवून न लावता त्यांना आसरा द्या.

- Advertisement -

help animals

निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना होणार आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसंच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्ग वादळाचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल सज्ज झाली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘निसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -