रयतेला फसवून स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही – नितेश राणे

शिवजयंतीचे औचित्त साधून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली आहे. राणे यांनी ट्विटरवरून ही टीका केली आहे.

Mumbai
आमदार नितेश राणे (फाईल फोटो)

भाजप-शिवसेना यांनी युती करण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केले आहे. सोशल मीडियावर या संदर्भात मीम्स प्रदर्शित होत आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी युतीवर टीका केली. ट्विटरच्या माध्यामातून त्यांनी ही टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकीय पक्ष नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील काही दिवसांपासून स्वाभिमान पक्षाकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती.

काय म्हणाले नितेश राणे

“माफ करा राजे… तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्व कळलेच नाही. आपल्याच रयतेला फसवून स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही.” – नितेश राणे

लोकांनी असे केले युतीला ट्रोल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here