नितेश राणे आणि महादेव जानकरांची आजची भेट रद्द!

Mumbai
Nitesh rane will meet mahadev jankar

आमदार नितेश राणे हे आज कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नितेश राणे आणि जानकर यांची आजची भेट रद्द झाली असल्याचं सूत्रांकडून समजतंय. नितेश राणे आणि महादेव जानकर हे चौथ्या आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी भेटणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, खरंतर रत्नागिरी- सिंधुदुर्गात रासपाचा पाठिंबा स्वाभिमान पक्षाला मिळावा यासाठी जानकर उमेदवार भेटणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली आहे. दरम्यान, भेटीच्या कारणाची चुकीची बातमी पसरल्यामुळे नितेश राणे यांनी आजची ही भेट रद्द केल्याचं समजतं आहे. आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास जानकर आणि राणे यांच्यामध्ये ही भेट घडणार होती.

‘भाजपकडून जगावटपात योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना असल्याने छोट्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपवर दबाव वाढवण्यासाठी छोट्या मित्र पक्षांची मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नितेश राणे जानकरांची भेट घेणार’… अशी चुकीची बातमी सगळीकडे पसरल्यामुळे नितेश यांनी ही भेट रद्द केल्याचं बोललं जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here