घरमहाराष्ट्रभर कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ...

भर कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ…

Subscribe

राष्ट्रगीत सुरु असतानाच नितीन गडकरी यांना चक्कर आली. ते खाली पडताच तो राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आली. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे एका कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली आहे. राष्ट्रगीत सुरु असताना अचानक त्यांना चक्कर आले. शेजारी उभे असलेले राज्यपाली सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. नितीन गडकरी यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणि राज्यपालांनी गडकरींना सावरले!

राहुरीच्या कृषी विद्यापीठातील पदवीदान कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी उपस्थिती लावली होती. पदवीदानाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरु होते. राष्ट्रगीत सुरु असतानाच नितीन गडकरी यांना चक्कर आली. ते खाली पडताच तो राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान त्यांना ताबडतोब हॉस्पिलटमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुरु आहे.

- Advertisement -

आता प्रकृती उत्तम 

नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. आता माझी प्रकृती उत्तम आहे. शुगर कमी झाल्यामुळे मला चक्कर आली असल्याचे त्यांनी सांगितले. राहूरीवरुन नितीन गडकरी विशेष विमानाद्वारे शिर्डीला रवाना झाले. त्याठिकाणी साईंचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते नागपूरला रवाना होणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी- नितीन गडकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -