घरमहाराष्ट्रठरलं! शिवसेना - भाजप युती नाहीच; 'सामना'तून सूतोवाच

ठरलं! शिवसेना – भाजप युती नाहीच; ‘सामना’तून सूतोवाच

Subscribe

'२०१४चा राजकीय अपघात २०१९मध्ये नाही' अशा शब्दात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आजच्या 'सामना संपादकीय'मधून देण्यात आले आहेत. दरम्यान आज वर्धापन दिनी उद्धव ठाकरे काय भूमिता घेतात याकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळातील जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘२०१४चा राजकीय अपघात २०१९मध्ये नाही’ अशा शब्दात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आजच्या ‘सामना संपादकीय’मधून देण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बंद दाराआड दोन तास काय चर्चा झाली याचा तपशील अद्यापही बाहेर आलेला नाही. शिवसेनेने युतीत राहावे यासाठी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची मनधरणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. अमित शहा यांच्या भेटीनंतर आज वर्धापन दिनी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२०१४चा राजकीय अपघात २०१९मध्ये नाही! – सामना

२०१४चा राजकीय अपघात २०१९मध्ये होणार नाही अशा शब्दात आज ‘सामना’च्या संपादकीयमधून शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाय महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल आणि दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल असे देखील सामनाच्या संपादकीयमधून म्हटले आहे.

- Advertisement -

युतीत धुसफूस

‘तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना’ अशीच परिस्थिती सध्या शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांची आहे. चार वर्षामध्ये दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवाय ‘सामना’तून देखील भाजपसहित पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘टीकेचे बाण’ सोडण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना – भाजपने एकमेकांवर जोरदार टीका केली. शिवाय पालघर पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परस्परांवर तोंडसुख घेतल्याचे पाहायाला मिळाले. एकंदरीत साऱ्या राजकीय घडामोडी पाहता एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी शिवसेना – भाजप या दोन्ही मित्रपक्षांनी सोडली नाही. त्यामुळे युतीत आलेली कटुता मिटवण्यासाठी अमित शहा यांना ‘मातोश्री’वारी करत उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. त्यावर उद्धव आता काय भूमिका घेतात हे आजच्या वर्धापन दिनीच स्पष्ट होईल.

शिवसैनिकांचा स्वबळाचा आग्रह

भाजपकडून वारंवार अपमान होत असल्याने शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे निवडणुका स्वबळावरच लढा अशी अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करत आहेत. शिवसैनिकांची अपेक्षा पाहता उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार का? यासाठी तमाम शिवसैनिकांचे डोळे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लागून राहिले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -