घरमहाराष्ट्रआवाज वाढव डीजे, नाहीतर विसर्जन नाही

आवाज वाढव डीजे, नाहीतर विसर्जन नाही

Subscribe

ध्वनी प्रदूषणामुळे गणेशोत्सवात डीजे वाजवण्याची परवानीग न्यायालयाने नाकारली. हा वाद उच्च न्यालायात देखील गेला. उच्च न्यायालयानेही मंडळाना दिलासा दिला नाही आणि डीजे वाजवण्यावर स्थगिती कायम ठेवली.

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेला परवानगी देण्यात आली नाही. पण पुणेकरांनी मात्र डीजेसाठी हट्ट धरला आहे. ‘डीजेला परवानगी दिली नाही, तर बाप्पांचे विसर्जन करणार नाही’, असा पवित्रा पुण्याताली गणेश मंडळांनी केला आहे. मिरवणुकीत डीजे वाजवण्यासाठी परवानगगी देण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळ एकत्र आली आहेत. पुण्यातील मंडळाच्या शिष्टमंडळांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील मंडळांची भूमिका स्पष्ट केली आहे.

हिंदू सणांवर गदा

ध्वनी प्रदूषणामुळे गणेशोत्सवात डीजे वाजवण्याची परवानीग न्यायालयाने नाकारली. हा वाद उच्च न्यालायात देखील गेला. उच्च न्यायालयानेही मंडळाना दिलासा दिला नाही आणि डीजे वाजवण्यावर स्थगिती कायम ठेवली. या नंतर संतप्त गणेश मंडळांनी या निर्णयासाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवत ही हिंदूंच्या सणांवर गदा असल्याचे म्हटले. शिवाय मंडळाची बाजू न्यायालयात मांडण्यास सरकार कमी पडले. शिवाय सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिला नाही, असे देखील मंडळांनी सांगितले. त्यामुळेच हा पवित्रा पुण्यातील मंडळांनी घेतला आहे.

- Advertisement -
वाचा- गणेश विसर्जनात डीजेचा ‘आवाज’ बंद!

डीजे नाही तर बाप्पाचं विसर्जन नाही

डीजेची परवानागी जो पर्यंत देणार नाही तो पर्यंत मंडळातून बाप्पा गणपती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर निघणार नाही. असे मंडळांकडून सांगण्यात आले आहे.

पाहा- डीजेचा आवाज बंदच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -