कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव भक्तांच्या उपस्थिती विना अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. तसेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी असणार आहे.

no entry for devotees in tuljapur during navratri till kojagiri purnima
कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाच देवस्थान असलेली श्री आई तुळजाभवानी देवीची नगरी दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिनानिमित्त भाविकांनी फुलून जाते. मात्र, यंदा या आई तुळजाभवानी मातेचा यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव भक्तांच्या उपस्थिती विना साजरा होणार आहे. नवरात्र काळात तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहर जनतेसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार तथा मंदिर संस्थांनचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी दिली आहे. तसेच यंदा नवरात्र काळात भाविकांना दर्शनासाठी तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

देवीचे घ्या लाईव्ह दर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच असणार आहे. त्यामुळे नवरात्र मंडळ आणि भाविकास बंदी असणार असून या काळात तुळजापूर शहरात प्रवेश बंद असणार आहे. तसेच सर्व प्रवेशद्वार आणि रस्त्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्याचप्रमाणे तुळजाभवानी मातेच्या रोजच्या धार्मिक पूजा विधी होणार असून मंदिर संस्थांच्या वेबसाईटवर देवीचे भक्तांनी लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

नवरात्र देवीच्या नित्य पूजा होणार

नवरात्रात देवीच्या नित्य पूजा कुलाचार, धार्मिक विधी हे दरवर्षी नियमाप्रमाणे होणार आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे गरबा, दांडिया यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. तसेच सार्वजनिक मेळावे आणि समारंभ यांच्यावर निर्बंध असणार आहेत.

५० पेक्षा जास्त व्यक्तींना बंदी

उत्सवा दरम्यान धार्मिक विधी काळात पुजारी, मानकरी आणि मंदिर अधिकारी असे सर्व मिळून ५० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहण्यास बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे पुजारी, मानकरी आणि कुलाचार करणारे नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे व्यापारी आणि इतर कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती तांदळे यांनी दिली आहे.


हेही वाचा – पर्यटकांनीच तोडला तिकोणा गडावरील दरवाजा; दुर्गप्रेमींमध्ये नाराजी