राजकारणात आता निष्ठा राहिली नाही; अजित पवारांची विखे-मोहितेंवर टीका

Indapur
अजित पवारांचे आश्वासन

अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील आणि अकलूजचे मोहिते पाटील यांनी आपली मुले भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र भाजपात गेले नाहीत. सध्या देशातील आणि राज्यातील राजकारणात निष्ठेला महत्व राहिले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आज केली आहे. बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर – भिगवण येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलण्याची भाषा केली जातेय. संविधान जाळण्याचे काम झाले असून शाहू – फुले- आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभावर देखील पवार यांनी टीका केली. १५ लाख देणार की नाही, काळा पैसा किती आणला, २ कोटी तरुणांना रोजगार देणार की नाही, याबाबत मोदी बोलत नाहीत. फक्त गांधी, नेहरू आणि पवार कुटुंबियांवर टिका करत आहेत. पवार कुटुंब आणि देशाच्या निवडणूकांचा काही संबंध आहे का? विकासाबाबत मोदी का बोलत नाहीत. नुसती जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा जोरदार आरोप अजित पवार यांनी केला.

“मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. जातीपातीचे राजकारण करु नका. तुमची जात काढली असं खोटं बोलून देशात गैरसमज पसरवू नका”, असा सल्लाही अजितदादा पवार यांनी मोदींना दिला. भाजपाचा एकही उमेदवार स्वतः ला मत मागत नाही, तर मोदींसाठी मत मागत आहे. अरे बाबांनो तुम्ही उमेदवार आहात की मोदी? असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here