Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र औरंगाबादचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही - बाळासाहेब थोरात

औरंगाबादचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही – बाळासाहेब थोरात

Related Story

- Advertisement -

एकत्र येऊन काम कसं करता येतं याचा आदर्श महाविकास आघाडी सरकारने घालून दिला आहे. असं असताना एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही असं काँग्रेसचं स्पष्ट मत असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. नामांतर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. त्यामुळे नामांतराला काँग्रेसचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. मात्र, कोणतंही सामाजीक तेढ निर्माण होतील असं काही करु नये, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. जिथे सरकार कार्यालय काम करतं तिथं चूक व्हायला नको यासाठी मी बुधवारी ट्विट केलं, असं थोरात म्हणाले. बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं, तेढ निर्माण करण्याचं काम नको. आमचा सत्तेत समान वाटा आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं आहे, असं थोरातांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरावर भाष्य केलं. छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. आता केंद्र सरकार आणि भाजपची जबाबदारी आहे, असं थोरात म्हणाले. विमानतळाचं नाव बदलणं याला आमचा विरोध नाही आहे. मात्र, एखाद्या शहाराचं नाव बदलाला आमचा विरोध असेल, असं थोरात म्हणाले. शहरांची नावं बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. तीन पक्षांमध्ये मतमतांतरं होऊ शकतात, पण याचा सरकारवर काहीही परिणाम नाही. चर्चेने सर्व प्रश्न सोडवू. संजय राऊत यांनी तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील, याची अग्रलेखातून काळजी घेतील, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – नामांतरावरून सेना आणि काँग्रेस मधील वाद टोकाला


 

- Advertisement -