घरमहाराष्ट्र'विरोधकांचा 'अब तक ५६' केल्याशिवाय राहणार नाही'

‘विरोधकांचा ‘अब तक ५६’ केल्याशिवाय राहणार नाही’

Subscribe

बारामती येथील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहिर सभेत केलेल्या भाषणामध्ये विरोधी पक्षांवर टीकाचा भडिमार केला आहे.

बारामतीमध्ये आज २१ एप्रिल रोजी जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक म्हटले की, प्रचार सभा आल्या आणि प्रचार सभा आल्या की आरोप-प्रत्यारोप आले. तसेच पक्ष नेत्यांकडून मतदरांना आवाहनसुद्धा केले जाते. असेच आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मतदारांना केले आहे. मतदान करताना सोनिया गांधी, शरद पवार, अजित दादा आणि मुलायमसिंह यांच्या मुला-मुलींचा विचार करु नका, तर मतदान करताना केवळ आपल्या मुला-मुलींचा विचार करा. आपल्या मुलांचे भले होईल अश्यांच्या हातातच सत्ता सोपवा, असे जोरदार आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज बारामती येथील जाहिर प्रचार सभेमध्ये केले आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांचा ‘अब तक ५६’ केल्याशिवाय राहणार नाही.” अशा शब्दात विनोद तावडे यांनी विरोधी पक्षांवर घणाघात केला. बारामती लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय (ए), रासप महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या आज पुणे येथे फुरसुंगी आणि हिंजवाडी येथे प्रचार सभा झाल्या. यावेळी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी उपस्थित होते.

भले करणाऱ्यांच्या हाती सत्ता द्या

प्रचारा सभे दरम्यान झालेल्या भाषणता तावडे यांनी सांगितले की, २०२० ते २०४५ मध्ये भारत हा जगातील सर्वात तरुणाईचा देश असणार आहे, अशा वेळी देशाचे नेतृत्व कणखर आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असेल तर आपल्या मुला-मुलींचे भले होईल. पण अन्य राजकीय नेते मात्र, आपल्या मुला-मुलींच्या भल्यासाठी काम करित आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्या मुला-मुलींच्या भविष्याचा विचार करुन त्यांच्या भल्यासाठी काम करत आहेत. हे लक्षात ठेवून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार करा, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

जनतेने केला निर्धार

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच २३ एप्रिल रोजी बारामतीमध्ये मतदान होणार आहे. यापूर्वी दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. २०१४ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांआधी झालेल्या लोकसभा निवडणुकामध्ये कधी ४८ टक्के, तर कधी ५२ टक्के मतदान झाले. फक्त १९७७ साली झालेल्या लोकसभेचे मतदान ६० टक्क्यांच्या वर गेले होते. नंतर २०१४ ला लोकसभेतील मतदान ६० टक्के इतके झाले होते. आताही दोन टप्प्यात झालेल्या मतदानात सुमारे ६२ टक्के मतदान झाले आहे. याचाच अर्थ मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज बारामती येथे बोलताना सांगितले.

आघाडीत मोदींचा पराभव करण्याची क्षमता नाही

विरोधी पक्ष नेत्यांना मोदी हरावेत असे वाटते, मात्र ज्यांना असे वाटते त्यांनी स्वत: निवडणुकीतून माघार घेतली आहे. मायावती, ममता दीदी, शरद पवार आणि चंद्राबाबू यांना वाटते की मोदी हरावेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी लढायची तयारी नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ५६ संघटना एकत्र येऊन तुटकी-मोडकी महाआघाडी केली तरीही ५६ इंच छाती असणाऱ्या आणि देशाचे कणखर नेतृत्व असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे महाआघाडीला शक्य नाही, असा ठाम विश्वास तावडे यांनी प्रचार सभे दरम्यान व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -