घरदेश-विदेशतुमचे चॅट कोणी वाचू शकणार नाही

तुमचे चॅट कोणी वाचू शकणार नाही

Subscribe

व्हॉट्सअ‍ॅपने आणलंय फिंगरप्रिंट लॉक

व्हॉट्सअ‍ॅप हे इंटरनेटच्या युगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक लोकप्रिय असे मोबाईल अ‍ॅप. अगदी सुरूवातीपासूनच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वैविध्यपूर्ण असे बदल झाले. कधी कल्पकतेने तर कधी युजर्सच्या कल्पकतेनुसार. आता व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांची गरज आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा ओळखून एक नवे फिचर लाँच केले आहे. ‘फिंगरप्रिंट लॉक’ असे या नव्या व्हॉट्सअ‍ॅप फिचरचे नाव आहे. या फिचरची चाचणीही पूर्ण झाली असून लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध देखील झाले आहे. या फिचरचे वैशिष्ठ्य म्हणजे तुमची चॅटिंग आणखी सुरक्षित होणार आहे.

कारण तुमच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर अ‍ॅपसंबंधी माहिती देणार्‍या ‘वाबेटाइन्फो’ च्या वृत्तानुसार हे फीचर आता अँड्रॉइड बीटा युजर्सच्या अ‍ॅप व्हर्जन 2.19.221 मध्ये उपलब्ध झाले आहे. अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी आठ महिन्यांपासून या फीचरवर कंपनीकडून चाचणी सुरू होती. जर तुमच्याकडे योग्य व्हर्जन असेल तर व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंट पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर प्रायव्हसी पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपने आयओएस वापरकर्त्यांसाठी हे फीचर तीन महिन्यांपूर्वीच उपलब्ध करून दिले आहे.

- Advertisement -

असे काम करेल हे फिचर
आपला मोबाइल फोन अनेकदा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस वाचले जाण्याची भीती अनेकांना असते. आता फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे परवानगीशिवाय व्हॉट्सअ‍ॅप उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडे ऑथेंटिकेशनसाठी तुमच्या फिंगरप्रिंट डाटाचा अ‍ॅक्सेस नसेल हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. पण लॉक असतानाही नोटिफिकेशन्सद्वारे रिप्लाय किंवा कॉल रिसिव्ह करता येईल. या फीचरमध्ये ऑटोमॅटिक लॉकसाठी तीन पर्याय असणार आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे तातडीने लॉक करण्याचा, दुसरा पर्याय एक मिनिटानंतर आणि तिसरा पर्याय 30 मिनिटांनंतर लॉकचा असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -