घरCORONA UPDATECM Uddhav Thackeray Live: 'पुन्हा लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही, पण'

CM Uddhav Thackeray Live: ‘पुन्हा लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही, पण’

Subscribe

“लस यायची तेव्हा येईल. लस आल्यानंतरही अँटीबॉडी विकसित व्हायला वेळ लागतो. त्यामुळे कोरोनापासून दोन नव्हे चार नव्हे तर जेवढे हात लांब राहता येईल, तेवढे लांब रहा. आपण धोक्याच्या वळणावर आलो आहोत, आता आपण जसे वागू त्यावरुन पुढची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सावध रहा”, असे संदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला. तसेच परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, तुर्त लॉकडाऊन पुन्हा लावण्याची इच्छा नाही. मात्र लोकांनी नियम न पाळल्यास आणि परिस्थिती बिकट झाल्यास अप्रिय निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही यावेळी ठाकरे यांनी दिला.

“आतापर्यंतचे आपण सर्व सण नियमात राहून नियंत्रणात राहून साजरे केले. खरंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे गर्दीचे सण पण आपण संयम दाखविला. त्याचप्रमाणे शिवसेनेने देखील ६६ वर्षांची परंपरा असलेला दसरा मेळाव शिवाजी पार्कवर न घेता, सावरकर स्मारकातील सभागृहात मर्यादित नेत्यांच्या उपस्थित घेतला. तसेच दिवाळीला मी आवाहन केले होते की, फटाके फोडू नका. या आवाहनाला देखील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. चार दिवसांवर कार्तिकी येत आहे. कृपया यावेळी लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वारी साजरी करावी. दिवाळी पाडव्यानिमित्त राज्याने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाविकांनी मंदिरात गर्दी करु नये”, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

आपण धोक्याच्या वळणावर उभे आहोत. लाटेची त्सुनामी होईल, असे वागू नका

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेवर नाराजी व्यक्त केली. याआधी आपण सर्वांनी प्रयत्न करुन
कोरोनाची लाट खाली आणली होती. मात्र आता लोकांच्या बेशिस्तीमुळे दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. युरोपिय देशात आपण पाहिले की दुसरी लाट ही त्सुनामी सारखी आलेली आहे. अहमदाबादमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्राला दुसरी लाट निश्चितच परवडणार नाही. कारण यावेळी ती लाट नसून त्सुनामी असेल, अशा इशारा ठाकरे यांनी दिला.

मागच्या ८ महिन्यांपासून आपले आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांना आपण किती ताण देणार? आरोग्य कर्मचारी अपुरे पडले तर आपल्याला कुणीही वाचू शकणार नाही. रुग्णसंख्या कमी करण्यामध्ये आतापर्यंत आरोग्य व्यवस्थेने महत्त्वाचे काम केले. लोकांनी असे समजू नये की कोरोना संपला आहे. अजूनही आपल्याला काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. काही जण मला सांगत आहेत की रात्रीचा कर्फ्यू लावा. पण कायदे करुनच सर्व होतं, असे नाही. लोकांनी जर स्वतःच नियंत्रण ठेवले तर काही कर्फ्यू लावण्याची गरज भासणार नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -