घरताज्या घडामोडीगॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; मुंबईचे दर १४५ रुपयांनी वाढले

गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; मुंबईचे दर १४५ रुपयांनी वाढले

Subscribe

देशभरात आजपासून विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला या दरवाढीमुळे आणखीनच त्रास सहन करावा लागणार आहे. भारतातील दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार महानगरांसाठी ही दरवाढ घोषित करण्यात आली आहे. फ्युल रिटेलर्स हे बाजार भावानुसारच ग्राहकांना सिलेंडर विकत असतात, मात्र सरकार प्रत्येक परिवाराला प्रति वर्षी १२ सिलेंडरवर थेट अनुदान देत असते.

जाणून घ्या नवीन दर

मुंबई – ८२९.५० (१४५ रुपयांची वाढ)

- Advertisement -

दिल्ली – ८५८.५० (१४४.५० रुपयांची वाढ)

कोलकाता – ८९६.०० (१४९ रुपयांची वाढ)

- Advertisement -

चेन्नई – ८८१.०० (१४७ रुपयांची वाढ)

विनाअनुदानित गॅसच्या किंमतीमध्ये जानेवारी २०२० पासून कोणताही बदल करण्यात आला नव्हता. फ्यूल रिटेलर्स प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरचा दर ठरवत असतात. इंडियन ऑइल कंपनी प्रति दिवस देशभरात ३० लाख गॅस सिलेंडरचे वितरण करते.

भारतात एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दोन गोष्टीवर निर्धारीत केली जाते. यामध्ये पहिले कारण आहे, एलपीजीचे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क तर दुसरे कारण आहे युएस डॉलर आणि रुपयामधील एक्सचेंज दर.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -