घरमहाराष्ट्रनारायण राणेंना नोटीस

नारायण राणेंना नोटीस

Subscribe

महाबळेश्वर तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बांधकाम केल्याबद्दल नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह 30 मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशावरून वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी ही नोटीस बजावली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामाबाबत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. याचिकेबाबत सुनावणी होऊ न हरित लवादाने 3 डिसेंबर 2019 रोजी आदेश दिले आहेत. त्या प्रमाणे प्रांताधिकार्‍यांनी संबंधितांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

महाबळेश्वर येथील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात सन 2015 मध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यामध्ये संबंधित अनधिकृत बांधकामे अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये करण्यात आली असल्याने ती हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारचे आदेश सातारा जिल्हाधिकारी आणि वाईच्या प्रांताधिकार्‍यांना देण्यात यावेत अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -