यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास प्रयत्न

Mumbai

निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा प्रशासन नेहमी प्रयत्नशील असते. याकरिता अनेक उपाययोजना देखील राबवत असतात. त्यानुसार यावेळी पहिल्यांदाच मतदान केंद्रे ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहे. यामुळे मतदारांना आपल्या घराजवळ असणारे मतदान केंद्र मतदारांना लगेच समजण्यात मदत होणार आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. या पर्यायाच्या माध्यमातून मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.


 हेही वाचा- मॉब लिंचिगशी संघाचा संबंध नाही – मोहन भागवत

यंदा मतदान केंद्रांची माहिती गुगल मॅपद्वारे

गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्याला बँक, बँकांचे एटीएम सेंटर, हॉटेल, हॉस्पिटल तसेच शाळा यासारख्या अनेक ठिकाणांची माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे यंदा मतदान केंद्रांची देखील माहिती मिळवता येणार आहे. विधानसभानुसार प्रत्येक मतदान केंद्र गुगल टॅग करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास प्रयत्न

गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातील मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारची उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ३० टक्क्य़ांपेक्षा कमी मतदान झाले अशा मतदानकेंद्रांची माहिती घेत या ठिकाणांवर अधिक लक्ष देऊन विधानसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.